Bharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया
Bharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया
दत्तात्रय भरणे सोडून महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी पदभार स्विकारला.. भरणे पुढील आठवड्यात पदभार स्विकारणार.. काही मंत्र्यांनी पदभार स्विकारला असला तरी प्रत्यक्षात काम सुरु केलंल नाही.. अजित पवार परदेश दौऱ्यावर आहेत.. तर एकनाथ शिंदेही कुटुंबासह सुट्टीवर होते.. मंत्री दत्तात्रय भरणे यांना क्रीडा खाते दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. काल कॅबिनेट बैठकीला देखील त्यांनी अनुपस्थिती लावली होती. एका कार्यकर्त्याच्या घरचे लग्न असल्याने कॅबिनेटला गेलो नसल्याचं आणि तसेच त्या संदर्भात माझे कॅबिनेटमध्ये विषय नसल्याने मी गेलो नसल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. आज आणि उद्या भरणे मतदारसंघातच असणार आहेत.. सोमवारी किंवा मंगळवारी दत्तात्रय भरणे पदभार स्विकारणार असल्याची माहिती आहे.. गेल्या दोन तीन दिवसांत पदभार स्विकारल्या मंत्र्यांची माहिती सोमवारी- दादा भुसे पदभार स्विकारला बुधवारी प्रकाश अबिटकर, नरहरी झिरवळ यांनी पदभार स्विकारला गुरुवारी आशिष जैसवल, माधुरी मिसाळ, गुलाबराव पाटील, अतुल सावे यांनी पदभार स्विकारला आज म्हणजे शुक्रवारी भरत गोगावलेंनी पदभार स्विकारला