Bharat Bandh : मुंबई, ठाणे, सोलापूर, पुण्यात शेतकरी संघटनांचं आंदोलन, Congress NCP चा पाठिंबा
संयुक्त किसान मोर्चाने आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात भारत बंदची हाक दिलीये. या भारत बंदच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यात मोटरसायकल रॅली काढलीय. बसस्थानक चौकातील काँग्रेस मुख्यालयापासून सुरू झालेली ही रॅली गांधी मार्ग, टिळक मार्ग, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन चौक या मार्गाने काढण्यात आलीय. हुतात्मा स्मारक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आलाय. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानं बंद करण्याची पटोलेंनी व्यापार्यांना विनंती केलीय. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना आणि वाहतूक नियमांचा पुर्णतः फज्जा उडवलाय.
यावेळी बोलतांना नाना पटोलेंनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात आजच्या बंदला काँग्रेसचा पाठींबा असल्याचं म्हटलंय. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांवरील कारवाईचा नाना पटोलेंनी निषेध केलाय. आता ईडी-सीबीआयची कारवाई सामान्य असल्याचं ते म्हणालेय. या संस्था आता भाजपाच्या ईशाऱ्यावर चालणाऱ्या संस्था असल्याचा आरोप त्यांनी केलाय.