Bhandara Pimpalgaon Leopard : शिकारीच्या शोधात आला, घरात शिरला; 3 तासांनी सुटका ABP Majha
भंडाऱ्याच्या पिंपळगाव कोहळीमध्ये बिबट्यानं तब्बल ३ तास एका घरात ठिय्या मांडला होता. लाखांदूर तालुक्यातल्या या गावात शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या जंगलालगत राहणाऱ्या रेवनाथ परशुरामकर यांच्या घरात शिरला. बिबट्या घरात आल्याचं समजताच घरातल्या लोकांचीही पळापळ झाली. ग्रामस्थांनीही या घराजवळ धाव घेतली. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी या घराच्या दरवाजाची कडी लावून घेतली. लाखांदूर वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वन आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यानंतर तब्बल ३ तास घरात ठाण मांडलेल्या बिबट्याला घराबाहेर काढण्यात आलं. घराबाहेर पडताच बिबट्यानं जंगलात धूम ठोकली.