Bhandara : धान खरेदीचे आदेश नसतानाही भंडाऱ्यात धान खरेदी, मोठ्या अफरातफर

Bhandara : धान खरेदीचे आदेश नसतानाही भंडाऱ्यात धान खरेदी, मोठ्या अफरातफर

राज्य सरकारनं धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिलेले असताना भंडाऱ्यात मात्र, बोटावर मोजण्याइतक्याच केंद्रांवर धान खरेदी सुरू झालेली आहे. अजूनही शेतकरी धान्य व्यापाऱ्यांना विकत असल्याचे चित्र भंडाऱ्यात दिसत आहे.  abp माझानं धान खरेदी केंद्राचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही अनेक केंद्रांच्या खरेदीचा प्रस्ताव पूर्ण झाला नसल्याने काही केंद्र वगळता बहुतांश केंद्रांना धान खरेदीचे आदेश नाहीत. असं असतानाही अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांना भूलथापा देत धानाची खरेदी करण्यात येत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळाबाजारी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola