Bhandara : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उभारलं वसतिगृह, चार वर्ष झाली तरी उद्घाटन नाही
एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा आहे. त्याच धरतीवर अल्पसंख्यांक समाजातील मुलांनाही शिक्षणासाठी चांगल्या दर्जाचं वसतीगृह निर्माण व्हावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भंडाऱ्यात अल्पसंख्यांक भवनाची निर्मिती करण्यात आली. सुमारे 4 कोटी रुपये खर्चून तीन मजली इमारत भंडारा शहरातील मध्यवर्ती भागात उभारण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागानं ही इमारत बांधून सुमारे सहा महिन्यापूर्वी नगर पालिकेकडे सोपवली.. इमारत पूर्णपणे तयार झालेली असतानाही जिल्हा किंवा नगर पालिका प्रशासनाला या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप सापडला नाही. त्यामुळे मागील चार वर्षांपासून ही इमारत अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. असं असलं तरी, कोट्यवधींच्या या इमारतीतील महागडे लाईट वायरिंग आणि अन्य साहित्य आता चोरीला जात असल्याचं चित्र समोर आलंय.... याकडे पालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय.