Bhandara Hospital Fire | भानारकर दाम्पत्याच्या मदतीला बारामतीमधील डॉक्टर सरसावले

Continues below advertisement
बारामती : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा बाळांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश हादरला. भंडारा जिल्ह्यातील भानारकर दाम्पत्याला तब्बल 14 वर्षांनी संतती प्राप्त झाली होती. परंतु या आगीत त्या बाळाचाही मृत्यू झाला. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर बारामतीमधील डॉक्टर भानारकर कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले आहेत. या दाम्पत्याला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संतती प्राप्त करुन देण्यासाठी बारामतीमधील इंडियन मेडिकल असोसिएशन पुढे आली आहे. याचा संपूर्ण खर्च बारामतीमधील डॉक्टर उचलणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram