Bhandara : कृष्ण विसर्जनासाठी निघालेली बोट बुडाली, बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक भरणं भोवलं
भंडाऱ्यात कृष्ण विसर्जनासाठी निघालेली बोट बुडालीय. खमारी बुटी इथंही ही घटना घडलीय. वैनगंगा नदीत छोट्याशा बोटीवरुन कृष्ण विसर्जनासाठी सहा जण निघाले होते. त्यावेळी अचानक ही बोट पलटली आणि बोटीतील सर्व सहा जण नदीत कोसळले.