Bhandara MVA : 2009 पासून भंडाऱ्याची शिवसेनेची जागा सोडणार नाही - प्रदीप खोपडे
Bhandara MVA : 2009 पासून भंडाऱ्याची शिवसेनेची जागा सोडणार नाही - प्रदीप खोपडे
राज्यात कमी झालेला पावसाचा जोर (Heavy Rain) आजपासून पुन्हा पाहायला मिळणार आहे. आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात कुठं ऑरेंज (Orange alert) तर कुठं यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज हवामान विभागानं (IMD) सावधानतेचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात आजचा हवामान विभागाचा अंदाज.
'या' भागात पडणार मुसळधार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग य तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलरक्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.