Bhagyashri Jadhav Paralympics : भाग्यश्री जाधवच्या जिद्दीला सलाम, पॅरालिम्पिकमध्ये भारताची ध्वजधारक

Continues below advertisement

Bhagyashri Jadhav Paralympics : भाग्यश्री जाधवच्या जिद्दीला सलाम, पॅरालिम्पिकमध्ये भारताची ध्वजधारक
कोमातून वाचली; पण कायमचे अपंगत्व आले. मात्र, महाराष्ट्राची पॅरा ॲथलिट भाग्यश्री जाधवने हार मानली नाही. समोर येईल तो अडथळा पार केला. आता ती पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पथकाची ध्वजधारक आहे. हे सारे तिने आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळवले. सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भाग्यश्री नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज गावची.. भाग्यश्रीच्या गावासाठी दुष्काळ नवीन नाही. त्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्रीचे वडील गतीमंद. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा भार काका आनंदराव जाधव यांच्यावर पडला. घरची परिस्थिती लक्षात घेऊन १९व्या वर्षीच भाग्यश्रीचे लग्न लावून देण्यात आले. भाग्यश्रीला तेव्हा कदाचित आपले भाग्य बदलले असेच वाटले होते. मात्र, तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला. त्यामुळे ती दोन आठवडे कोमात गेली. त्यातून ती वाचली खरी; पण कंबरेतील नस दबल्याने तिला कंबरेपासून खाली अपंगत्व आले. दोन्ही पायाने अधू झालेली भाग्यश्री कुटुंबातल्या कोणाच्यातरी आधाराने किंवा कोणाच्यातरी खांद्यावर असा प्रवास करून न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करीत होती. मात्र, तिच्या सासरच्या लोकांची निर्दोष मुक्तता झाली. आजही पोटगी मिळवण्यासाठी तिचा लढा सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram