Bhagat Singh Koshyari : 'या' वादग्रस्त वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता

या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आलीय. महाराष्ट्राचे भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आलाय. कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. गेल्या काही दिवसांत भगत सिंह कोश्यारी यांनी केलेली वक्तव्य वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अनेक संघटनांनीही कोश्यारी यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात आंदोलनं केली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. या पार्श्वभूमीवर आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, देशभरातील १३ राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola