Matheran Mystery: बंगळूरुचे प्रोफेसर Shanmukha Balasubramaniam यांचा मृत्यू; घातपात की अपघात, कारण अस्पष्ट
Continues below advertisement
बंगळूरु येथील प्राध्यापक शण्मुख बालसुब्रमण्यम (Shanmukha Balasubramaniam) यांचा मृतदेह माथेरानच्या दरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. 'ट्रेकिंगला गेल्यानंतर ते घसरुन पडलेले असावेत,' असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शण्मुख हे माथेरानमध्ये एका कंपनीसाठी प्रेरणादायी भाषण देण्यासाठी आले होते, मात्र ते नियोजित कार्यक्रमाला न पोहोचल्याने त्यांचा शोध सुरू झाला. अखेर किंग्ज जॉर्ज पॉइंटपासून सुमारे ८०० फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर, १७ जणांच्या बचाव पथकाने मृतदेह दरीतून बाहेर काढला. सध्या हा अपघात आहे, आत्महत्या की घातपात, या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement