Belgaum : बेळगावात विद्यार्थ्यांच्या भांडणाला सीमावादाचा रंग, कन्नड संघटनांनी रोखला महामार्ग
Belgaum : बेळगावात विद्यार्थ्यांच्या भांडणाला सीमावादाचा रंग, कन्नड संघटनांनी रोखला महामार्ग
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा सध्याचा तापलेला विषय. मात्र याच तापलेल्या विषयात अनेकजण आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना बेळगावात घडली. बेळगावच्या गोगटे महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. मात्र या वादाला सीमावादाशी जोडून कन्नड संघटनांनी आंदोलन केलं आणि बेळगाव-गोवा महामार्ग रोखला. मात्र मुळात हा वाद दोन कन्नड विद्यार्थ्यांमधलाच होता अशी माहिती पोलिसांनी दिलेय.