Yellamma Devi Yatra | इतिहासात पहिल्यांदाच बेळगावातील यल्लमा देवीची यात्रा रद्द
दिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण राज्यभरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. पण सौंदत्ती इथल्या श्री यल्लमा देवीचे मंदिर 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशामुळे यावर्षीची श्री यल्लमा देवीची 30 डिसेंबर रोजी होणारी पहिली पौर्णिमा यात्रा रद्द झाली आहे. इतिहासात प्रथमच सौंदत्ती श्री यल्लमा देवीची यात्रा रद्द होण्याचा प्रसंग उद्भवला आहे.