Beed Yavatmal : बीड आणि यवतमाळमध्ये वाळू माफियांची दहशत ABP Majha
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे...बीडच्या गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे...गोदावरीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली... या कारवाई दरम्यान ६ ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. मात्र ही कारवाई का केली असा जाब विचारत वाळू माफियांनी पोलीस नाईक गणेश धनवडेंना ट्रॅक्टरनं धडक दिली, ज्यात ते गंभीर जखमी झालेत... तर तिकडे यवतमाळमध्ये देखील वाळू माफियांनी कळंबचे तलाठी मिलिंद लोहत यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे.. तलाठी मिलिंद लोहत हे वाळू तस्करीचा व्हिडीओ काढत असताना त्यांना मनोज भगत आणि मंथन भगत यांनी दोघांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय. या दोघांवरही कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.