Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?

Continues below advertisement

Beed Jail News : बीडच्या जिल्हा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला असून वाल्मिक कराड गँगची (Walmik Karad Gang) दहशत पुन्हा वाढल्याची चर्चा रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. अझर अब्दुल रहमान पठाण असं मारहाण झालेल्या कैद्याचं नाव आहे.

या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कैद्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मारहाण झालेल्या कैद्याने एका व्यक्तीशी संवाद साधतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

Beed Jail Fight : बसण्याच्या जागेवरून वाद, मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, जेलमधील बॅरिकेटमध्ये बसण्याच्या जागेवरून हा वाद झाला. या वादातून सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप यांनी अझर पठाण याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर कैद्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola