Beed News | बलात्कार पीडीत महिला गावातून हद्दपार; बीडच्या गेवराई तालुक्यातील धक्कादायक प्रकार

पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पाचेगाव, जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा या तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव घेतला आहे. एवढंच नाही तर गावकऱ्यांनी या महिलेविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातसमोर ठिय्या दिला.

ही महिला गावकऱ्यांना त्रास देते, ती व्यभिचारी आहे, असा आरोप करत तीन गावांनी बलात्कार पीडित महिलेसह तिच्या कुटुंबाविरोधात हद्दपारीचा ठराव मंजूर केला. अत्याचार पीडित महिलेला आधार देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हद्दपार करण्याचा निर्णय या गावांनी घेतला. या अमानवीय घटनेनंतर सामाजिक स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola