Beed student Neet Issue : हैद्राबादमध्ये शिकणाऱ्या अंबाजोगाईतील मुलीला नीट परीक्षेतील गुणांसाठी दलाचा फोन

Beed student Neet Issue : हैद्राबादमध्ये शिकणाऱ्या अंबाजोगाईतील मुलीला नीट परीक्षेतील गुणांसाठी दलाचा फोन

नीट घोटाळ्याची व्याप्ती शेजारच्या राज्यापर्यंत ही वाढली..

हैदराबाद मध्ये शिकत असलेल्या अंबाजोगाईच्या मुलीलाही आला होता फोन..

नीट घोटाळ्यामध्ये मराठवाड्यातील अनेक बडे मासे सापडत असतानाच केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या तेलंगणा मध्ये सुद्धा हे नीट घोटाळ्यातील दलाल पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे अंबाजोगाई येथे इंजिनियर असलेल्या तारेक उस्मानी यांची मुलगी हैदराबाद मध्ये नीट चा अभ्यास करत होती.. त्या ठिकाणी त्या मुलीलाही या दलालांचा दोन वेळा फोन आला ८० लाख रुपये लागतील असे सांगून तब्बल साडेसहाशे मार्क्स नीट परीक्षेत मिळतील असे सुद्धा सांगण्यात आले होते.. पण या मुलीने मला असे कोणतेही मार्क्स वाढवायचे नाहीत असे सांगून त्यांना पुन्हा कॉल करू नका असे सांगितले काय एकूण त्या दलालाचे बोलणे झाले होते यासंदर्भात तारेक उस्माणी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी..

ही बातमी पण वाचा

Nana Patekar : 'त्या' सीनच्या वेळी अभिनेत्याची पँट खरंच ओली झाली... नाना पाटेकरांनी सांगितला तो किस्सा

Nana Patekar :  आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी सिनेसृष्टीत छाप सोडली आहे. नाना पाटेकर यांची भूमिका असलेल्या चित्रपटांचे आजही कौतुक सुरू असते. नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'प्रहार' (Prahaar) चित्रपट आजही लोकप्रिय आहे. आपल्या दिग्दर्शनातील पदार्पणाच्या चित्रपटाच्या वेळी घडलेला एक किस्सा नाना पाटेकरांनी सांगितला. 

नाना पाटेकर यांनी 'प्रहार' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. 'द लल्लनटॉप' या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी विविध प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली. 'प्रहार'या आपल्या पहिल्या दिग्दर्शनातील चित्रपटाबाबत बोलताना नानांनी सांगितले की, 'परिंदा'नंतर 'प्रहार'ची जुळवाजुळव सुरू केली. मलाही आर्मीत जायचे होते, या चित्रपटाच्या निमित्ताने मी ती इच्छाही पूर्ण केली. या चित्रपटात सई परांजपे यांचा मुलगा गौतम जोगळेकर हा सिनेमाटोग्राफर देबू देवधर यांचा अस्टिस्टंट होता. त्याला मी या भूमिकेसाठी निवडले. त्यावेळी देबूने म्हटले की ह्याला व्यवस्थित बोलता येत नाही. पण, मी त्याला सांगितले की मला असाच अभिनेता हवाय.

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola