BEED : 250 पैकी 100 डेपो ST कामगारांकडून बंद, मागण्या पूर्ण होईपर्यंत कर्मचारी संप सुरू ठेवणार
प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. बीड माजलगाव परळी अंबाजोगाई या बस स्थानकातून आज येथे एसटी सकाळपासून बाहेर गेलेली नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम आहेत.