Beed: एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न ABP Majha
एसटी कामगारांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.३४ दिवसांनंतर काल परळी आगारातून बस सुटली.परंतु यामुळे संपांत फुट पडली.अनेक दिवसांपासूनच्या कामगारांच्या एकजुटीला तोडण्यात प्रशासन यशस्वी झाले.परंतु आज सकाळी वेगळीच घटना समोर आली आहे.काल परळी आगारातून बस सुटली आणि आज चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.परळी आगारातून काल जी बस सुटली होती त्या बसचा हा चालक असल्याची माहिती समोर येत आहे. या विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या कामगाराला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.