Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV

Continues below advertisement

Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV

कुणावर तरी अन्याय होत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संरपंच संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली जाते. ज्या प्रकारे ही हत्या करण्यात आली त्यावरून महाराष्ट्र हा बिहारच्या मार्गावर चाललाय का असा प्रश्न माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला. खंडणी प्रकरणात ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो वाल्मिक कराड अजूनही खुला फिरतोय, तर आरोपी सुदर्शन घुले फरार आहे अशा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजित पवारांनी इथल्या आमदारांना मंत्री करू नये अशी मागणीही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या सात्वनासाठी संभाजीराजे बीडमध्ये गेले होते. 

संभाजीराजे म्हणाले की, "महाराष्ट्रात अशी घटना घडू शकते? महाराष्ट्र बिहारच्या मार्गावर चाललय का? पवनचक्कीच्या गोडाऊनवर सोनवणे यांना दमदाटी केली जात होती. त्याचा जाब विचारासाठी संतोष देशमुख गेले असता त्यांची क्रूर हत्या करण्यात आली.  यावेळी पोलीस मजा बघत होते.  या प्रकरणात पोलिस निरीक्षकाला सहआरोपी करा."

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram