Landslide Threat | बीडमधील Kapildharwadi ला धोका, पुनर्वसनाची मागणी
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी गावाला मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. गावातील घरे, शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता तहसील प्रशासनासह भूगर्भ अभ्यासकांनी गावामध्ये पाहणी केली. परंतु अद्यापही प्रशासनाने ग्रामस्थांसाठी ठोस पावलं उचललेली नाहीत. ग्रामस्थांनी स्थलांतर करून आता पुनर्वसन करायची मागणी केली आहे. गावामधील रस्त्यांना जवळपास एक ते चार फुटांपर्यंतच्या अंतराच्या भेगा पडल्या आहेत. चार दिवसांपासून या गावामधील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत. प्रशासनाने कपिलधारकडे जाण्याचा रस्ता तूर्तास बंद केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement