Beed Rain Fury | बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस, कडा शहर पाण्याखाली

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सध्याही पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील कडा शहर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. बीड-अहमदनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कडा शहर परिसरातील ग्रामीण भागातील नदीनाले तुडुंब भरले आहेत. याच नदीनाल्यांचे पाणी शहरात शिरल्यामुळे अनेक कुटुंबे पाण्याखाली गेली आहेत. जवळपास पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर अशा प्रकारे पाण्याखाली गेले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola