Beed Protest कोरडेवाडी इथे साठवण तलाव व्हावा यासाठी आंदोलन,रास्तारोको आंदोलनादरम्यान राडा

Continues below advertisement
बीडच्या (Beed) केज (Kej) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलनाला (Rasta Roko Protest) हिंसक वळण लागले आहे. कोरडेवाडी ते साठवण तलाव व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली, ज्यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा रास्तारोको अहिल्यानगर-अहमदपूर (Ahmadnagar-Ahmedpur) राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) करण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. घटनास्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, गेल्या दोन तासांपासून हा गोंधळ सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना शांत करण्याचे आणि महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola