Beed : आपल्या खात्याकडे लक्ष द्यावं आणि त्यातून लोकांचा विकास करावा - प्रीतम मुंडें : ABP Majha

एकच खाते आहे ते सुद्धा नीट सांभाळता येत नाही- प्रीतम मुंडे यांची धनंजय मुंडे वर टीका केलीय.. तर काही दिवसापूर्वी जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले होते की पंकजा मुंडे यांच्याकडे देखील चार-चार खाते असून त्यांनी काय विकास कामे केली त्यांच्याकडे एवढे खाते असून देखील त्यांना निवडणुकीत परळीचा जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली आणि या टीकेनंतर आता प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना उत्तर दिल आहे धनंजय मुंडे यांच्याकडे जे खात आहे ते खात त्यांना सांभाळता येत नसेल तर ते जनतेचे प्रश्न कसे सोडणार त्यामुळे त्यांनी इतरां वर टीका करण्यापेक्षा आणि रेल्वेच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा आपल्या खात्याकडे लक्ष द्यावं आणि त्यातून लोकांचा विकास करावा अस उत्तर प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिल आहे . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola