Beed Politics: 'कोणाची अॅलर्जी नाही, पण...', पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना त्यांच्याच मतदारसंघात थेट इशारा?

Continues below advertisement
बीड जिल्ह्याच्या राजकारणात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 'बीड मतदारसंघ तर माझाच आहे, पण मला आता आष्टी मतदारसंघावर जास्त प्रेम करावं लागेल', असे वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या बालेकिल्ल्यात लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंडे यांच्या या भूमिकेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, याला धसांसाठी थेट आव्हान मानले जात आहे. यावर सुरेश धस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'त्या राज्याच्या मंत्री आहेत, त्यांना काय लक्ष घालायचंय ते घालू द्या', असे धस म्हणाले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून, आगामी काळात याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola