Pankaja Munde | एक दिवस दसरा मेळावा शिवतीर्थावर घेणार; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण
कुणीतरी म्हटलं उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाही. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? उसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावं लागत असं नाही. पंकजा मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की हेडलाईन होते. मुंडे साहेब साखर कारखानदार होते ते पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. लवाद नको असे कोण मागणी करतेय. शरद पवारांनी आता पुढची बोली करावी. ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहेत. 27 तारखेच्या बैठकीत जो निर्णय होईल ते जाहीर करा नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावर पार पडला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी निवडणुकीत पराभूत झाले माझ्या पेक्षा कार्यकर्ते जास्त खचले. रस्त्यावर कसे उतरायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. ऊसतोड कामगारांचा मेळावा हा एका राजकीय पक्षाचा कसा काय? असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी 10 हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं. मी त्यांचं स्वागत करते. मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावं लागेल.
पंकजाताई आता घरा बाहेर येणार नाहीत अशा चर्चा करत होते. मला येण्यासाठी कोरोनामुळं परवानगी मिळाली नाही. मुंडेसाहेबांचं दर्शन मी ऑनलाईन घेतलं. मात्र भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय दसरा मेळावा होऊच शकत नाही. तुम्ही आलातच मी ही रिस्क घेतली. मीही मास्क काढून टाकला. मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. कुणी फुलांनी स्वागत केलं, कुणी अश्रुंनी स्वागत केलं. माझ्या दारा समोरची गर्दी कधी कमी होऊ देऊ नको अशी मागणी देवा जवळ केली असल्याचं त्या म्हणाल्या.