बीडमध्ये प्रियकरानं प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळलं; पीडितेचा मृत्यू, आरोपी फरार
Continues below advertisement
बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न प्रियकरांनं केला होता. या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, उपचारा दरम्यान या पीडित तरूणीचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement