Beed Maratha Reservation Issue : बीडमध्ये दगडफेक प्रकरणात 254 जणांना अटक, पाच मुख्य आरोपींचा समावेश
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती यामध्ये पोलिसांनी दहा टोळ्या निष्पन्न केले असून 254 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश असल्याची माहिती देखील बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे तर 300 जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.. आतापर्यंत 2 हजारहून अधिक जणांची पोलिसांनी चौकशी केली असून यामध्ये 254 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत तर 17 अल्पवयीन मुले देखील या जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये सहभागी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीला अद्याप जामीन मिळालेला नाही
Continues below advertisement