Beed Lok Sabha : आदळआपट करून काय साध्य करणार? Pankaja Munde यांचा बजरंग सोनावणेंना सवाल
Beed Lok Sabha : आदळआपट करून काय साध्य करणार? Pankaja Munde यांचा बजरंग सोनावणेंना सवाल
माझाही पाच वर्षांपूर्वी पराभव झाला होता मात्र तो हसतमुखाने मी स्वीकारला होता.. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून अगदी मतमोजणी प्रक्रियेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या अगदी बीडच्या जिल्हाधिकारी या मतमोजणी प्रक्रियेत नको असा आरोप केला होता यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी केवळ विशिष्ट एका जातीचे आहेत म्हणून कोणावरती असे आरोप करणं हे योग्य नाही आणि इतकी आदळ आपट करणं बरोबर नाही तुम्हाला पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांच्या संदर्भामध्ये केला आहे.. मी कर्म चांगले केले आहेत त्यामुळे मला फळाची चिंता नाही मी कोणतेही अभद्र कर्म केलेले नाहीत.. चार जूनच्या निकालानंतर नेमकं काय बदलणार आहे यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाले आहेत बीडचा खासदार बदलणार आहे या सगळ्या संदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे गोविंद शेळके यांनी