Karuna Sharma : करुणा शर्मा यांना कोर्टात हजर करणार, अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा

बीड :  करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला. काल करुणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना अंबाजोगाई कोर्टात नेण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola