Beed : जयदत्त क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांना धक्का, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह सेनेत प्रवेश

बीड नगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊ ठेपली आहे. त्यामुळे सगळेच इच्छुक कामाला लागले आहेत. या रणसंग्रामात विधानसभेत मागे पडलेले काका पुन्हा एकदा पुतण्यावर कुरघोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पुतण्या संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या गटातील पाच नेते फोडण्यात यश मिळवले आहे. मागील दीड वर्षांपासून हे नगरसेवक अलिप्त होते. मात्र आता त्यांची भेट घेऊन जयदत्त क्षिरसागर यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचा मार्ग मोकळा केला आहे. येत्या 28 मार्च रोजी बीडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हे पाचही जण राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत. पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola