Beed : बीड जिल्ह्यातील शहाजनपुर चकला गावात अवैध वाळू उपशाचे 4 बळी ABP Majha

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपशाने चार मुलांचा बळी घेतला.. गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला गावात सिंदफणा नदी पात्रात ही दुर्दैवी घटना घडलीय.. अवैध वाळू उपशामुळे सिंदफणा नदीत मोठे खड्डे पडलेत..  नदी पार करत असताना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ४ मुलांचा यात बुडून मृत्यू झालाय.. १२ ते १५ वयोगटातील चार मुलांचा हकनाक बळी गेल्यानं संताप व्यक्त होतोय. अवैध वाळू उपशानं या मुलांचा जीव घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. अशा वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola