बीडच्या शासकीय रुग्णालयाला तीन नवीन रुग्णवाहिका,एका रुग्णवाहिकेत 22मृतदेह ठेवल्याचा झाला होता प्रकार

Continues below advertisement

बीड जिल्हातील अंबोजोगाई कोरोनाचं हॉटस्पॉट ठरत आहे. अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही येथे जास्त आहे. त्यामुळेच प्रशासनही ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी होताना दिसत आहे. येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच रविवारी दुपारी 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी मृतदेह  रुग्णवाहिकेत कसे ठेवले असतील याचा अंदाज बांधलेलचा बरा. रुग्णालय प्रशासनाच्या या असंवेदनशील कारभारावर टीका होत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram