Coronavirus | होम क्वॉरंटाईन राहायचं सोडून गावभर फिरले, चार रुग्णांवर गुन्हा; बीडमधील प्रकार
होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तीने घराबाहेर फिरू नये, इतर कोणाच्या संपर्कात येऊ नये असं वारंवार प्रशासनाकडून सांगून सुद्धा अनेक लोक ऐकत नाहीत. याचाच एक परिणाम म्हणून बीडमध्ये असलेल्या एका कुटुंबातील सदस्यामुळे आज बीड शहरातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याची दखल घेत बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह चार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.