Shashikant Shinde On Faltan Doctor Case: 'प्रशासनाचा धाक राहिला नाही, डॉक्टर तरुणीची आत्महत्या, व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Continues below advertisement
बीड येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, यावर शशिकांत शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांच्यात तीव्र चर्चा झाली. 'ज्यावेळेला एकाद्या शासकीय अधिकाऱ्याला वाटतं की माज्या मागे कोणतरी आहे आणि कोणी काय करू शकत नाहीये, त्यावेळेला ह्या अशा प्रकारचं धाडस वाढतं,' असं थेट वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं. पीडित डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी त्रास होत असल्याची तक्रार DYSP कडे केली होती, मात्र वेळेवर कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता, असा आरोप शिंदे यांनी केला. राजकीय दबावामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असून पोलीस यंत्रणा पोखरली गेली आहे, असेही ते म्हणाले. यावर उत्तर देताना, नीलम गोऱ्हे यांनी संपूर्ण पोलीस दलाचे खच्चीकरण करू नये असे आवाहन केले. चांगल्या अधिकाऱ्यांचे नीतिधैर्य खच्ची होऊ नये आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, यासाठी सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे मत त्यांनी मांडले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola