Dhananjay Munde | मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर जाणार | ABP Majha

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवान गडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जाणार आहेत. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवान गडावर दर्शनासाठी बोलावलं होतं.  आज ते नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथ गडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत..या पार्श्वभूमीवर तिन्ही गडावर धनंजय मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola