Beed Crime: किरकोळ कारणावरून हॉटेल कामगाराला अमानुष मारहाण, लोखंडी रॉडने पाय तोडला!

Continues below advertisement
बीड (Beed) जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीये. शहरातील एका हॉटेल कामगाराला झालेल्या अमानुष मारहाणीप्रकरणी करण पवार (Karan Pawar), दिलीप पवार (Dilip Pawar) आणि अभिषेक खाडे (Abhishek Khade) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका हॉटेलवर पाच जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून धुडगूस घालत हॉटेल कामगाराला लोखंडी रॉड आणि दांडक्याने निर्दयपणे मारहाण केली. या हल्ल्यात कामगाराचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्याच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola