Beed Raj Kishore Modi : राजकिशोर मोदी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या मार्गावर ABP Majha
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील यांची खासदार पदी निवड करून काँग्रेसने बीड जिल्ह्यातली काँग्रेस बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे असे असतानाच काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी मात्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राजकिशोर मोदी च्या माध्यमातून मागच्या तीस वर्षापासून अंबाजोगाई नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात होती..रजनी पाटील यांनी बीड जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी काहीच काम केलेल नाही त्याचा दिल्लीत संपर्क जास्त आहे त्या ग्राउंड वर येत नाहीत असा आरोप करीत काँग्रेस सोडत असल्याचे जाहीर केले आहे..