BEED Classes War : क्लासेस चालकावर चाकू हल्ला, विद्यार्थ्यांच्या पळवापळवीवरून दाखवला पिस्तुलाचा धाक
वाळू माफिया, भूमाफिया, खून, दरोडे अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असताना बीडमध्ये कोचिंग क्लासेस चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु झालीय. हर्षल केकान यांचे बीडच्या शाहूनगर भागात युनिक अकॅडमी नावाचे कोचिंग क्लासेस आहेत. केकान यांच्यावर बुधवारी चाकू हल्ला झाला. त्यांनी हा हल्ला चुकवला. त्यानंतर पिस्तूल रोखत धमकावल्याचा आरोप या क्लासेस चालकानं केलाय. विद्यार्थ्यांच्या पळवापळवीवरुन हा हल्ला झाल्याचं समोर येतंय. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलंय.