Beed: भररस्त्यात वळूंची झुंज, बघ्यांची गर्दी ABP Majha
बीडच्या गेवराई शहरातील मुख्य रस्त्यावर आज दोन वळूंची झुंज लागली होती. ही झुंज जवळपास अर्धा तास सुरु होती. दरम्यान ही झुंज पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. बैलांच्या या जोरदार झुंजीमुळे अनेकांची पळापळही झाली. दरम्यान शहरातील रस्त्यावर मोकाट जनावर फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय..