Beed | मुंबईत सेवा बजावण्यास नकार, 31 एसटी कर्मचारी निलंबित
बीड विभागातील 31 कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून निषेध, एसटी महामंडळाने केलेली कारवाई चुकीची असल्याची संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची एबीपी माझाला माहिती, मुंबईत बेस्ट सेवेसाठी आल्यानंतर कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा मिळत असल्याचा संघटनेचा आरोप, बीड विभागातील 120 कर्मचारी कोव्हिडं पॉझिटिव्ह निघाले याची जबाबदारी कोण घेणार? महामंडळाकडून 50 लाखांच्या विम्याची केवळ घोषणा मात्र लाभ तुलनेने खूपच कमी, कर्मचाऱ्यांवरील कारवाई तात्काळ मागे घ्या अन्यथा आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा