Be Positive | सोलापूर जिल्ह्यात भरतेय 'पारावरची शाळा', अनोख्या पद्धतीने ज्ञानदानाचं काम सुरू

 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या शाळा 15 जुलै पासून सुरू होणार आहेत. मात्र 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 1 ली ते 5 वी च्या वर्गात विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होत असतो. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. मात्र जिल्ह्यात तब्बल 78 हजार विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्यचे काय असा प्रश्न समोर होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने अनोख्या पद्धतीने ज्ञानदानाचे काम सुरु केले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola