Be Positive : आर्थिक मदतीसाठी उभी राहिली चळवळ, आवाहनानंतर जमली 1 कोटी रुपयांची मदत
कोरोनामूळे जगण्यासाठी संघर्ष तरीत असलेल्या एका तरूणाला वाचविण्यासाठी अख्खं जग धावून आलं आहे. हा तरूण आहेय अकोला जिल्ह्यातील तेल्हाराचा. देवानंद सुरेश तेलगोटे असं या तरूणाचं नाव आहे. त्यानं मुंबईतील पवईच्या आयआयटीमधून 'केमिकल इंजिनिअरींग'चं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची ऑगस्टमध्ये 11 तारखेला मुलाखत आहे. कोरोनामूळे देवानंदची फुफ्फुसं निकामी झाल्याने त्याच्यावर सध्या हैद्राबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंतच्या उपचारासाठी त्याला जगभरातून एक कोटींची मदत मिळाली आहे. मात्र, आता फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आणखी एक कोटींवर रूपयांची त्याला आवश्यकता आहे. त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी परत देश आणि जगाला मदतीची साद घातली आहे. देवानंदला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी समाज माध्यमांवर 'हेल्पींग हँड्स फॉर देवा' या नावाने एक 'कँपेन' चालविलं आहे.