Barsu Refinery Protest :बारसूमध्ये जमिनीचं सर्वेक्षण, महिलांकडून सर्वेक्षणात अडथळे आणण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

बारसू रिफायनरीवरुन सध्या कोकण तापलंय.. स्थानिकांच्या मोठ्या विरोधानंतरही बारसू रिफायनरीसाठी जमीन सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झालीय. मात्र आज सकाळपासून बारसूत स्थानिक विरुद्ध  पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.. सर्वेक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलनकांनी केला. आंदोलनातील महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या.. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली. त्यानंतर काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.. आंदोलन स्थळावरून माध्यम प्रतिनिधींना देखील काही काळ हटवण्यात आलं होतं... या सर्व विरोधानंतर बारसूत सर्वेक्षणाला सुरुवात झालीय... दुपारनंतर पोलीस बंंदोबस्तात ड्रिलिंग सुरू करण्यात आलं... सध्या प्रस्तावित जागी ड्रिलिंगचं काम शांततेत सुरू असल्याचं कळतंय.. मात्र बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राजकारणही चांगलचं तापलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram