Baramati: मृत पशुधनासाठी भरपाई देणार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ABP Majha
राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडलीयीत . अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळी-मेंढी करता चार हजार रुपये, गायी करता प्रत्येकी चाळीस हजार रुपये, बैला करता तीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलेय . पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी याठिकाणी अवकाळी पावसात नुकसान झालेल्या व मृत पावलेल्या मेंढ्यांच्या पाहणी राज्यमंत्री भरणे यांनी केलीय त्यावेळी त्यांनी ही मदत जाहीर केलीय अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या जनावरांची संख्या वाढू शकते असेही त्यांनी सांगितलेय .. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 2133 लहान मोठी जनावरे मृत पावली आहेत. त्यामध्ये शेळ्या 86 आहेत 2038 मेंढ्या मृत्यू मुखी पडल्या असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या अवहालात म्हटल आहे..