Baramati Lockdown : बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन

Continues below advertisement

बारामती : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या काळात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरु राहतील. दूध विक्री सकाळी 7 ते 9 यावेळीत सुरु राहील. भाजी मंडई आणि इतर सर्व आस्थापना बंद राहतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram