Baramati Agricultural Exhibition : कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन बारामतीत
कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज बारामतीत होतेय. माय्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक रणवीर चंद्रा आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे आर्टिफिशयल इंटेलिजन्स विभागाचे डॉ अजित जावकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, रोहित पवार उपस्थित असणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. अजित पवार यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.