Johnson & Johnson पावडरचं उत्पादन,विक्री बंद करण्याचा निर्णय योग्यच, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका
Continues below advertisement
जॉन्सन अँड जॉन्सनच्या 'बेबी टाल्कम पावडर' उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केलाय. राज्य सरकारने गुरुवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिलीय.. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करणं ही याचिकाकर्त्या कंपनीची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बेबी पावडरच्या गुणवत्तेची खात्री न देता त्याचा अंतिम वापर होईपर्यंत नियमांनुसार उत्पादन विक्री करता येणार नाही, अशी ठाम भूमिका देखील राज्य सरकारनं या प्रतिज्ञापत्रातून घेतली आहे. त्याची दखल घेत या बेबी टाल्कम पावडरच्या आणखी काही नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे का? अशी विचारणा करत राज्य सरकारला त्यावर 14 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिलेेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Government Jhonson And Jhonson Johnson & Johnson Powder Johnson & Johnson Baby Powder