Banjara Reservation Suicide | धाराशिवमध्ये Pawan Chavan ची आत्महत्या, हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाची मागणी
धाराशिव जिल्ह्यात बंजारा समाजातील पवन चव्हाण या ३२ वर्षीय पदवीधर तरुणाने आत्महत्या केली आहे. पवन चव्हाणच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पवन चव्हाण हा बेरोजगार होता. जालना येथील आरक्षणाच्या आंदोलनातून परतल्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. पवनने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बंजारा समाजाला इतर प्रवर्गाप्रमाणे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे अशी इच्छा व्यक्त केल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. "आमच्या बंजारा समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे एसटी प्रवर्गामधे आरक्षण मिळायला पाहिजे," अशी त्याची मागणी होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पवन चव्हाण आरक्षणासाठी सुरू असलेल्या विविध आंदोलनांमध्ये आणि बैठकांमध्ये सक्रियपणे सहभागी होता. या घटनेमुळे बंजारा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.