Banjara Protest : बंजारा समाजाचं उपोषण अखेर मागे, मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटीला

Continues below advertisement
जालन्यामध्ये (Jalna) बंजारा समाजाचे (Banjara Community) ST प्रवर्गातील आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. आंदोलक विजय चव्हाण (Vijay Chavan) यांनी गेले नऊ दिवस उपोषण केल्यानंतर, सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर हा निर्णय घेतला. 'हैदराबाद गॅझेटेर (Hyderabad Gazetteer) लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा', अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या शिष्टमंडळात मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. आता बंजारा समाजाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, सोमवार किंवा मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola